Posts

Postpartum - बाळंतपण

*Diet items* अळीव खीर खसखस खीर शेवया खीर मेथी पेज शतावरी दुध पंचामृत डिंक अळीव लाडू पाले भाज्या नाचणी, जोंधळे भाकरी बाजरी भाकरी, सतू Kulith pithi, soup Bhijavlele badam, kalya manuka *औषधे* माझ्यासाठी पिंपळमुळ चूर्ण आवळा हळद चूर्ण त्रिकटवादी चूर्ण गोळ्या बाळंत काढा बालशेपा काढा गार्गी साठी  बाळगुटी - सोने मध संतुलन बालमृत *Experience* पहिला आठवडा मी हॉस्पिटलमध्ये होते.  ती खूपच रडत होती. जास्त रात्रीची रडायची. तिला भूक होती पण मला सुरवातीला दूध येत नसल्यामुळे तीच पोट भरत नव्हतं म्हणून ती रडायची. 2- 3 दिवसांनी तिला शु करताना त्रास व्हायचा. Water intake कमी होता म्हणून उन्हाळी चा त्रास झाला तिला. माझे टाकेही दुखत होते. दुसरा आठवडा घरी येऊन routine set करत होतो. तिचं दिवसा झोप आणि रात्री जागरण सुरू होतं.  तिसरा आठवडा मला sore nipples चा खूप त्रास झाला. तूप लावलं. गुरू काकांनी घावमारी चा पाला दिला तो वाटून लावला. पण ते दूध कमी झाल्यावर दुखतात हे लक्षात आलं. पहाटे दूध कमी व्हायचं. मग रात्री उशिरा 11 वाजता खीर खायला सुरवात केली. मग थोडा त्रास कमी झाला. तिला घामाने बारीक पुरळ आ...

मातृत्व

माझ्या मुलीनं आज मला पहिल्यांदा आई अशी हाक मारली. तिला आई म्हणता यायला लागलं.  मला जितका आनंद झाला तितकाच मोठ्ठा गोळा आला पोटात. हे आईपण आपल्याला नक्की झेपेल ना याच दडपण येतं.  आता ती एक वर्षाची झाली.  एक वर्ष कसं आणि केव्हा गेलं कळलंच नाही!  हे आईपण फार busy असतं ना!  आपल्याला कितीही fast life किंवा tight schedule ची सवय असली तरी या आईपणाचा pace काही वेगळाच असतो आणि तो पकडताना प्रत्येकाची एक वेगळी धडपड असते. या धडपडीत एखादा मदतीचा हात म्हणजे नुकताच जीच्याकडे मातृत्वाचा अनुभव आहे अशी आपली एखादी मोठी बहीण, नणंद, जाऊ किंवा जवळची मैत्रीण. आणि या सगळ्यांचे अनुभव, सल्ले घेऊन आपण आपली तारेवरची कसरत करण म्हणजे मातृत्व.