Postpartum - बाळंतपण
*Diet items*
अळीव खीर
खसखस खीर
शेवया खीर
मेथी पेज
शतावरी दुध
पंचामृत
डिंक अळीव लाडू
पाले भाज्या
नाचणी, जोंधळे भाकरी
बाजरी भाकरी, सतू
Kulith pithi, soup
Bhijavlele badam, kalya manuka
*औषधे*
माझ्यासाठी
पिंपळमुळ चूर्ण
आवळा हळद चूर्ण
त्रिकटवादी चूर्ण गोळ्या
बाळंत काढा
बालशेपा काढा
गार्गी साठी
बाळगुटी - सोने मध
संतुलन बालमृत
*Experience*
पहिला आठवडा
मी हॉस्पिटलमध्ये होते.
ती खूपच रडत होती. जास्त रात्रीची रडायची.
तिला भूक होती पण मला सुरवातीला दूध येत नसल्यामुळे तीच पोट भरत नव्हतं म्हणून ती रडायची.
2- 3 दिवसांनी तिला शु करताना त्रास व्हायचा. Water intake कमी होता म्हणून उन्हाळी चा त्रास झाला तिला.
माझे टाकेही दुखत होते.
दुसरा आठवडा
घरी येऊन routine set करत होतो. तिचं दिवसा झोप आणि रात्री जागरण सुरू होतं.
तिसरा आठवडा
मला sore nipples चा खूप त्रास झाला. तूप लावलं. गुरू काकांनी घावमारी चा पाला दिला तो वाटून लावला.
पण ते दूध कमी झाल्यावर दुखतात हे लक्षात आलं. पहाटे दूध कमी व्हायचं. मग रात्री उशिरा 11 वाजता खीर खायला सुरवात केली.
मग थोडा त्रास कमी झाला.
तिला घामाने बारीक पुरळ आलेलं. दिवसातून 2 3 वेळा तिचा घाम पूर्ण टिपून, कोरडी करून मग baby powder लावल्यावर गेलं.
चौथा आठवडा
तिला पोटात गॅस चा त्रास झाला. गॅस झाले की रडायची आणि release झाले की शांत व्हायची.
खडे हिंग उगाळून पोटाला बेंबीभोवती लावला. त्याने ती रडायची थांबली. रिलॅक्स झाली.
बालशेपा च पाणी आणि साधं पाणी उकळून ड्रॉपर ने पाजल्यामुळे तिचा उन्हाळी चा त्रास कमी झाला.
मी दूध पिताना थोडं पातळ करून, वावडिंग घालून उकळून प्यायला सुरवात केली.
पाचवा आठवडा
पोटात गॅस चा प्रॉब्लेम अजून होतो थोडा. WTE मध्ये मी वाचलं की तिला दिवसातून 15 mins tummy time दिला पाहिजे. पोटावर झोपवलं पाहिजे. ते आता सुरू करणारे. Gastica drops doc ने दिलेले ते before feeding 15 mins द्यायचे आहेत हे मी त्यावरच वाचलं न्हवत आता तस सुरू केलाय.
दुसरा महिना
मला ऍसिडिटी चा त्रास होतोय. दर 5 6 दिवसांनी डोकं दुखतं. पित्त होतं. उन्हाळा खूप वाढल्यामुळे असेल.
मला नाकाचा सायनस चा पण त्रास होता प्रेग्नन्सी च्या आधी. प्रेग्नन्सी मधे मुळीच काही झालं नाही आता बहुतेक तो त्रास पुन्हा सुरू झालाय. त्यामुळेही डोकं दुखतं.
तिचा gases चा त्रास आहे अजूनही पण आता Gastica ड्रॉप्स नियमित वेळच्या वेळी देऊन त्रास होत नाही हे लक्षात आलंय. प्रत्येक alternate feeding च्या आधी 15 20 mins 3 4 ड्रॉप्स देते. दिवसातून एकदा पोटावर झोपवते. ओवा आणि हिंग चा वास देते तिला खूपच त्रास झाला तर.
आता दुसरा महिना संपत आला. तिची भूक वाढतेय. माझं दूध 3 4 दिवस कमी झालंय. खाणं डोकं दुखण्यामुळे असावं.
तिसरा महिना
रात्री heavy जेवण टाळण्यामुळे डोकं दुखायचं जरा कमी आहे. दूध कमी न होण्यासाठी आता लाडू खाणे वाढवलंय. दूध पण पूर्वीइतक पातळ करून पीत नाही. वावडोंग मात्र घालते.
सावंतवाडी ला डॉक्टर खानोलकरांकडे जाऊन आलो. Gases साठी त्यांनी वेगळे ड्रॉप्स दिलेत. त्यामुळे गॅसेस चा त्रास कमी झाला. त्यांनीही संध्याकाळी 15 मिनिटे तिला पोटावर ठेवायची सांगितलं.
तिची नजर आता चांगलीच सुधारलीय. जरा जरा मान धरते. हसणं सुरू झालय.
रात्री झोपायचं routine हळू हळू सेट होतंय. सगळं ok असेल, पोट भरलेलं असेल आणि संध्याकाळी जागी असेल तर 3 4 तास रात्रीची झोपते.
मध्ये injection होतं तेव्हा 2 3 दिवस रडली आणि पहिल्या दिवशी ताप होता थोडा.
चौथा महिना
मी सासरी शिरोडा ला आले. नॉन veg डाएट झाला. तिला पाहिले दोन दिवस तिखटपणा चा त्रास झाला. मग normal झाली.
उपडी पडायला try करत होती. आता उपडी वळते त्यामुळे गॅसेस चा प्रॉब्लेम नाहीये
Injection च्या वेळी दिल्यावर लगेच मांडीला चोळायचं आणि घट्ट दाबून धरायच. त्यामुळे मांडी नंतर दुखत नाही.