मातृत्व
माझ्या मुलीनं आज मला पहिल्यांदा आई अशी हाक मारली. तिला आई म्हणता यायला लागलं.
मला जितका आनंद झाला तितकाच मोठ्ठा गोळा आला पोटात. हे आईपण आपल्याला नक्की झेपेल ना याच दडपण येतं.
आता ती एक वर्षाची झाली.
एक वर्ष कसं आणि केव्हा गेलं कळलंच नाही!
हे आईपण फार busy असतं ना!
आपल्याला कितीही fast life किंवा tight schedule ची सवय असली तरी या आईपणाचा pace काही वेगळाच असतो आणि तो पकडताना प्रत्येकाची एक वेगळी धडपड असते.
या धडपडीत एखादा मदतीचा हात म्हणजे नुकताच जीच्याकडे मातृत्वाचा अनुभव आहे अशी आपली एखादी मोठी बहीण, नणंद, जाऊ किंवा जवळची मैत्रीण.
आणि या सगळ्यांचे अनुभव, सल्ले घेऊन आपण आपली तारेवरची कसरत करण म्हणजे मातृत्व.